Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
आषाढी वारीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. वारकरी अजितदादांच्या आठवणीत भावुक होत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या आत्मशांतीसाठी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना केली.
आषाढी वारीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. वारकरी अजितदादांच्या आठवणीत भावुक होत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या आत्मशांतीसाठी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना केली. माध्यमांशी संवाद साधताना जय पवार म्हणाले की, “अजितदादांच्या आठवणीने अनेक वारकरी भावुक होत आहेत. २०२४ मध्ये याच रथामध्ये बसून आमच्यात ज्या चर्चा झाल्या होत्या, त्याच आठवणी आज पुन्हा जाग्या झाल्या.”
यावेळी त्यांनी अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देत, “मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की, दादा जिथे कुठे असतील त्यांना शांती लाभो. तसेच सर्व वारकऱ्यांच्या मनातील प्रार्थना श्री विठ्ठलाने स्वीकाराव्यात,” असे भावनिक शब्दांत सांगितले.
दरम्यान, जय पवार यांच्या या वक्तव्यानंतर वारीतील भावनिक वातावरण अधिक गहिरं झाल्याची चर्चा असून, त्यांच्या प्रतिक्रियेची राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
