Jitendra Awhad |अजित पवार यांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी… पुण्यातील त्या बॅनरवरून जितेंद्र आव्हाड यांचं मोठं वक्तव्य

Jitendra Awhad |अजित पवार यांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी… पुण्यातील त्या बॅनरवरून जितेंद्र आव्हाड यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jan 03, 2026 | 4:05 PM

प्रत्येक बॅनरवर शरद पवारांचा फोटो असावा अशी इच्छा अजित पवारांची आहे. यावर, तशी इच्छा असेल तर त्यात काही वाईट नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच अजित पवारांच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

पुण्यातील अजित पवार यांच्या पक्षाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो छापण्यात आला होता त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवारांचा बॅनरवर फोटो कायम राहणार असा प्रश्न अजित पवारांना करण्यात आला त्यावेळी तुमच्या तोंडात साखर पडो असं उत्तर देत प्रत्येक बॅनरवर शरद पवारांचा फोटो असावा अशी इच्छा अजित पवारांची आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास दादा राजी आहेत का? असे संकेत त्यांच्या उत्तरातून मिळतात का? अशा चर्चा रंगू लागल्यात. यावर तशी इच्छा असेल तर त्यात काही वाईट नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले तसेच अजित पवारांच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी, असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Published on: Jan 03, 2026 03:52 PM