Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणी’चा फायदा, बळीराजाचं काय? पीक विम्यासाठी शेतकरी तासनतास वेटिंगवर…
महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. सेतू कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. मात्र लाडकी बहीणचा अर्ज भरण्यासाठी सेतू कार्यालयात गर्दी होत असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी तासनतास थांबावं लागतंय.
लाडकी बहीण योजनेचा बळीराज्याच्या पीक विम्याला फटका बसला असल्याचे समोर येत आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना ज्या दिवसापासून जाहीर केली तेव्हापासून महिलांचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. सेतू कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. मात्र लाडकी बहीणचा अर्ज भरण्यासाठी सेतू कार्यालयात गर्दी होत असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी तासनतास थांबावं लागतंय. मात्र आता पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारने पिक विम्यासाठी मुदत वाढवून दिल्याने शेतकऱ्यांना याच्या फायदा होणार आहे. पिक विमा काढण्यासाठी आता ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. वेबसाईट चालत नसल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित होते. मात्र मुदत वाढवून दिल्यामुळे शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळाला आहे. इतकंच नाहीतर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. असे असले तरी पीक विम्याची वेबसाईट सुरू करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
