Sambhajinagar : संभाजीनगरात छावा संघटनेसह कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Sambhajinagar : संभाजीनगरात छावा संघटनेसह कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक

| Updated on: Jul 21, 2025 | 1:10 PM

छत्रपती संभाजीनगर येथे देखील आता छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक आंदोलन करण्यात येत आहे.

लातूरमध्ये काल विजय घाडगे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीनंतर आता राज्यभरात छावा संघटनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. ठीकठिकाणी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं असून अजित पवारांच्या गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथे देखील आता छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी कॉंग्रेस आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेत घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. आंदोलनाच्या वेळी पोस्टर देखील आंदोलकांनी फाडले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संभाजीनगरच्या क्रांती चौक याठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर काही महिला कार्यकर्त्यांनी क्रांती चौक परिसरातील रस्त्यावर मध्यभागी बसून आंदोलन  सुरू केल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळाली. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

Published on: Jul 21, 2025 01:10 PM