Kolhapur MVA Sabha : नागपूरनंतर कोल्हापुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा; गांधी मैदानातून हुंकार भरणार
मविआची वज्रमुठ सभा ही कोल्हापूरात होणार आहे. नागपुरनंतर कोल्हापुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होणार असून ती 28 एप्रिलला गांधी मैदान मध्ये होणार सभा आहे
कोल्हापूर : आता राज्यातील विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकांचे पडगम वाजण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार राजकीय पक्ष सभा घेताना दिसत आहेत. त्यानुसार महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांविरोधात राण उठवण्याचे काम सुरू आहे. याच्या आधी छत्रपती संभाजीनगर येथे पहिली सभा पार पडली असून या सभेला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता नागपूरमध्ये वज्रमुठ सभा पार पडणार आहे. त्यानंतर मविआची वज्रमुठ सभा ही कोल्हापूरात होणार आहे. नागपुरनंतर कोल्हापुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होणार असून ती 28 एप्रिलला गांधी मैदान मध्ये होणार सभा आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील वज्रमुठ सभांना कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे फुटलेले आमदार आणि दोन्ही खासदार याच्या विरोधात काय भूमिका घेतात आता हे पाहावं लागणार आहे.
Published on: Apr 12, 2023 11:06 AM
