गरिबांच्या मुलांना मराठीतून…, सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं नवं स्वप्न

| Updated on: Apr 29, 2024 | 4:35 PM

'मी ठरवलय गरीब आईच्या मुला, मुलीला डॉक्टर, इंजिनिअर बनवायच. त्यांना मोठ्या पदावर बसवायचं आहे. गरीब मुला-मुलींना इंग्लिश मीडियमध्ये शिक्षण घेणं शक्य आहे का? आधी मराठी मीडीयममध्ये शिक्षण घेतल्यानंतर टाळ लागायचं. पण आता असं नाहीय, तुम्ही मराठी मीडियममध्ये शिकून डॉक्टर, इंजिनिअर बनू शकता'

तुम्ही काँग्रेसचा 60 वर्षांचा कार्यकाळ पाहिला. माझी 10 वर्ष पाहिली आहेत. मागच्या 10 वर्षात सामाजिक न्यायासाठी जितकं काम झालं, तितकं स्वातंत्र्यानंतर कधीही झालं नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील सभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी पाहिलेलं नवं स्वप्नही सोलापुरकरांना बोलून दाखवलं. ‘मी ठरवलय गरीब आईच्या मुला, मुलीला डॉक्टर, इंजिनिअर बनवायच. त्यांना मोठ्या पदावर बसवायचं आहे. गरीब मुला-मुलींना इंग्लिश मीडियमध्ये शिक्षण घेणं शक्य आहे का? आधी मराठी मीडीयममध्ये शिक्षण घेतल्यानंतर टाळ लागायचं. पण आता असं नाहीय, तुम्ही मराठी मीडियममध्ये शिकून डॉक्टर, इंजिनिअर बनू शकता. इंग्रजी नाही आलं, तरी चालेलं तुम्ही देश चालवू शकतात.. हेच मोदीच स्वप्न आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज मी तुमच्याकडे काही मागण्यासाठी आलो आहे. मागण्यासाठी आलोय, कारण यापुढे मला बरच काही द्यायचं आहे. मला धन, दौलत नकोय. मला यश, किर्ती नकोय. मला तुमचा आशिर्वाद हवा आहे, असं मोदी म्हणाले.

Published on: Apr 29, 2024 04:35 PM