उद्धव ठाकरे यांच्यासाठी रामटेक ते मुंबई महाभारत यात्रा, कुणी केलं आयोजन?

| Updated on: Mar 24, 2023 | 4:23 PM

VIDEO | 'त्या' निर्णयानंतर जनमानसातील रोष व्यक्त करण्यासाठी दहा दिवस विविध जिल्ह्यामधून महाभारत यात्रा थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर होणार दाखल

Follow us on

यवतमाळ : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आल्याने अद्याप ठाकरे गट आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. यानिर्णयानंतर शिवसेना पूर्णतः संपली अशी टीकाही केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्यासाठी रामटेक ते मुंबई महाभारत यात्रा काढण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अन्याय होत असल्याचा आरोप करीत युवा परिवर्तन की आवाज संघटनेकडून गडमंदिर रामटेक ते मुंबई येथील मातोश्री भवनपर्यंत महाभारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ मध्ये यात्रा संयोजक निहाल पांडे यांनी नागरिक आणि काही राजकीय लोकांच्या भेटी घेतल्या. उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध हुकूमशाहीने कट रचला गेला, त्यांचे सरकार पाडून पक्षाचे नाव आणि चिन्हावर देखील ताबा मिळविण्यात आला. याविरोधात जनमानसातील रोष व्यक्त करण्यासाठी दहा दिवस विविध जिल्ह्यामधून महाभारत यात्रा थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळ येथे पोहोचून त्यांना अभिवादन करणार आहे.