चिन्ह गोठवल्या प्रकरणी दिल्ली हायकोर्टात ठाकरे गटाची धाव, यासह पहा नव्या अपडेट्स महाफास्ट न्यूज 100 मध्ये
ठाकरे गटाने चिन्ह गोठवल्या प्रकरणी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावर आता उद्या सुनावणी होणार आहे.
शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पक्षाच्या नावाचे 3 पर्याय दिले आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची आणि बाळासाहेवांची शिवसेना अशा नावांचे पर्याय आयोगाला शिंदे गटाने दिले आहेत. तर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पक्षाच्या नव्या चिन्हासाठी गदा, त्रिशूळ आणि उगवत्या सुर्याचा पर्याय दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून देखिल त्रिशूळ, मशाल आणि उगवत्या सुर्याचा पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. मात्र यानंतर आता शिंदे गटाकडून त्रिशूळ आणि उगवत्या सुर्याचा पर्याय दिल्याने पुन्हा एकदा पेच निर्माण झाल्यास ही दोन्ही चिन्हे देखिल आयोग देणार नसल्याचे शक्यता आहे. यादरम्यान ठाकरे गटाने चिन्ह गोठवल्या प्रकरणी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावर आता उद्या सुनावणी होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ठाकरेंनी फक्त वेळकाढूपणा केला असे फडणवीस म्हणाले. यादरम्यान शिंदे गटाचे संजय शिरसाठ यांनी देखिल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान 2024 ला होणाऱ्या निवडणुकीत मोदींविरोधी लढ्याचं नेतृत्व ठाकरे यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.
