आशा भोसले यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान; म्हणाल्या 90 वर्षे या दिवसाची वाट पाहिली…

| Updated on: Mar 25, 2023 | 7:45 AM

Asha Bhosale Maharashtra Bhushan Awards : या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, मंगेशकर परिवारातील सदस्य, संगीत-चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्यासह असंख्य मुंबईकर उपस्थित होते.

Follow us on

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा राज्यातील सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियापरिसरात हा सोहळा पार पडला.  आपल्या गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तेव्हा त्यांनी अनेकांचे आभार मानले यात त्यांनी लता मंगेशकर यांच्या नावाचाही उल्लेख केला. मागची 90 वर्षे या दिवसाची वाट पाहिली. आता वय 90 असलं तरी अजून 90 वर्षे गाण्याची इच्छा आहे. रोते नही तो हसते जीना है, असंही आशा भोसले म्हणाल्या.