अनुराधा पौडवाल यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’, महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च सन्मान

अनुराधा पौडवाल यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’, महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च सन्मान

| Updated on: Aug 13, 2024 | 5:54 PM

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला असून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत घोषणा केली आहे. मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांची समिती या पुरस्कारांची शिफारस करत असते.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक विभागातर्फे प्रदान करण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार अनुराधा पौडवाल जाहीर करण्यात आला आहे. यासह नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे. तर तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची आणि बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. अशा अनेक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून सर्व पुरस्कारार्थींचे मंत्री मुनगंटीवार यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Published on: Aug 13, 2024 05:54 PM