Maharashtras Maratha Reservation : नेमक्या कोणत्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार?
हैदराबाद गॅझेटवरून सरकारने जीआर काढला आणि त्यावरून जरांगेनी मराठवाड्यातील सर्वच मराठ्यांना कुणबीच जात प्रमाणपत्र मिळणार असा दावा केला. पण मंत्री बाबनकुळे कुणाला जात प्रमाणपत्र मिळणार हे स्पष्ट त्यांनी केले आहे. तर कुणबी नोंद आणि वंशावळीशिवाय जात प्रमाणपत्र मिळणार नाही असं बाबनकुळे म्हणाले.
मराठवाड्यातील सर्वच मराठे ओबीसी आरक्षणात येणार असा जरांगे पाटील दावा करत आहेत. हैदराबाद गॅझेटवरून जो जीआर सरकारने काढला त्यावरून मराठे ओबीसी झालेत असं जरांगे सांगताहेत. पण ज्यांची कागदोपत्री कुणबी नोंद आहे त्याच मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल असं ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बाबनकुळेंनी म्हटले आहे. पुरावा म्हणून वंशावळ नोंद आवश्यक आहेच, हेही बाबनकुळेनी स्पष्ट केले आहे. तर ज्या हैदराबाद गॅझेटचा जरांगे दाखला देताहेत त्या गॅझेटमध्ये तालुक्यानुसार व्यवसाय आणि जातीसंदर्भातली आकडेवारी आहे.
या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारचा हा जीआर जरांगेंना फसवणारा असल्याचे म्हटले आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने निजामकालीन आणि जुन्या महसूल कागदपत्रांची तपासणी करून 58 लाख कुणबी नोंदी शोधल्या आहेत. मराठा अभ्यासक विनोद पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिली. या नोंदींवरून सुमारे 2 लाख 39 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु, ही नोंद असणे हेच कुणबी जात प्रमाणपत्रासाठी पात्रतेचे निकष आहेत. मंत्री बाबनकुळे यांनीही हेच स्पष्ट केले आहे. यावरून मराठा समाजात असलेला गोंधळ आणि निराशा स्पष्ट होते. या विषयावरून राजकीय चर्चा आणि वाद निर्माण झाले आहेत.
