Chandrashekhar Bawankule : काँग्रेसला फोडा अन् खाली करा… ते आपल्याकडे आले तर… भाजपच्या बड्या नेत्याचा थेट आदेश
राजकीय पक्षांमधील फोडाफोडीचे राजकारण सुरू असताना याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना एक आदेश दिला आहे. तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करून टाका असंच थेट त्यांना सांगितलं आहे.
‘काँग्रेसला फोडा आणि रिकामी करा’, असं म्हणत भाजपच्या भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना थेट आदेश दिल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात नुकत्याच झालेल्या पदाधिकारी बैठकीत भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे मोठं वक्तव्य केले आहे. ‘संग्राम थोपटे यांच्यासारखे जे कोणी दिसतील त्यांना पक्षात घेऊन या… तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करून टाका. काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा फायदा आहे. माझं काय होईल याची काळजी अजिबात करू नका, देवेंद्रजी आहेत, मी आहे, मुरलीधर मोहोळ आहेत, अमित शाह आहेत. आम्ही तुम्हाला न्याय देणार की त्यांना देणार असे सांगत काँग्रेस फोडा, रिकामी करा’, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणत असल्याची एक ऑडिओ सध्या व्हायरल होतेय. मात्र टीव्ही ९ मराठी या ऑडिओची पुष्टी करत नाही. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला खाली करण्याचं हे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांच्या जिव्हारी लागलं असून त्यावर वर्षा गायकवाड यांनी पलटवार केल्याचे पाहायला मिळाले.
