पावसाचा हाहाकार! शेतात गुडघाभर पाणी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यात चिंता…

पावसाचा हाहाकार! शेतात गुडघाभर पाणी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यात चिंता…

| Updated on: Aug 17, 2025 | 4:00 PM

वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. काटेपूर्णा नदीवरील पूल जीर्ण झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. चार वेळा अतिवृष्टी झाल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, हळद आणि कापसाची पिके सर्वाधिक प्रभावित झाली आहेत. एक शेतकरी पुरात वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडला आहे. जिल्ह्यातील १४ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत आवश्यक आहे.

विठ्ठल देशमुख, प्रतिनिधी. 

वाशिम जिल्ह्यात दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाला तर दुसरीकडे नागपूर संभाजीनगर महामार्गावरील काटेपूर्णा नदीवरील पूल जीर्ण झाल्यामुळे व पाणी पुलावर टेकल्यामुळे रात्रीपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून काही वाहन वळवण्यात आली आहे तर जऊलका पोलीस काटेपूर्णा नदीवर खडा पहारा देत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. तर या पावसाने जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात तब्ब्ल चार वेळा अतिवृष्टी होऊन नदी नाल्याला पूर आल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय,शेकडो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, हळद, कपाशी या पिकाचं मोठं नुकसान झालंय. 14 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, दहा पेक्षा जास्त जनवारांचा मृत्यू झालाय. तर ऐका शेतकऱ्याचाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झालाय त्यामुळं शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज आहे.

Published on: Aug 17, 2025 03:59 PM