HC on SSC Exam | दहावी परीक्षेबाबतची याचिका धनंजय कुलकर्णी यांनी मागे घेतली

HC on SSC Exam | दहावी परीक्षेबाबतची याचिका धनंजय कुलकर्णी यांनी मागे घेतली

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 2:30 PM

महाराष्ट्रातील दहावीची परीक्षा रद्द होण्यावर अखेर न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब झालं आहे. कारण दहावीची परीक्षा रद्द करण्याविरोधात राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका धनंजय कुलकर्णी यांनी मागे घेतली. हायकोर्टाने धनंजय कुलकर्णींवर प्रश्नांची सरबत्ती करत, मुलांच्या आरोग्यावरुन धारेवर धरलं. त्यानंतर धनंजय कुलकर्णी यांनी आपली याचिका मागे घेतल्याने, ही याचिका आता निकाली निघाली.