Maharashtra Weather :  विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा झोडपणार, हवामान खात्यानं दिला ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather : विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा झोडपणार, हवामान खात्यानं दिला ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

| Updated on: Jun 06, 2025 | 12:20 PM

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी थैमान घालणाऱ्या पावसाने काहिशी विश्रांती घेतली असली तरी पुन्हा एकदा राज्याला पाऊस झोडपण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या आगमनानंतर पावसानं राज्याला चांगलंच झोडपून काढलं होतं. मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसाच्या एन्ट्रीने शेतपीकं, घरासह रस्त्याचं देखील मोठं नुकसान झालं होतं. अशातच राज्यातील पावसासंदर्भात हवामान खात्याने पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मराठवाड्यासह विदर्भाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासह छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीडसह लातूर जिल्ह्याला देखील हवामान खात्यानं अलर्ट दिला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्याने राज्यात पुन्हा एकदा उकाडा वाढला आहे.

Published on: Jun 06, 2025 12:20 PM