Maharashtra Rain Alert : पुन्हा रेड अलर्ट… मुंबईकरांची धाकधूक वाढली, आज राज्यात कुठे धुव्वाधार? हवामान खात्याचा इशारा काय?
पालघर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगडला देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याला पाऊस झोडपून काढण्याचा इशारा आहे.
मुंबईसह उपनगराला काल मंगळवारी पावसाने चांगलंच झोडपून काढल्यानंतर त्याचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर पाहायला मिळाला. आजही सकाळपासून पुन्हा पावसाची संततधार सुरू आहे. वाहतूक सुरळीत सुरू असली तरी मात्र पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार तास मुंबई, उपनगरासह ठाण्यात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळणार असून मुंबईला आज पुन्हा रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांची धाकधूक पुन्हा वाढली आहे. तर दुसरीकडे पुणे, रायगडमध्येही मध्यम ते जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे. दरम्यान, सतर्क रहावं, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलंय.
Published on: Aug 20, 2025 09:35 AM
