Mahayuti Alliance : मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती एकत्र लढणार, जिथं अडचण तिथं…

Mahayuti Alliance : मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती एकत्र लढणार, जिथं अडचण तिथं…

| Updated on: Dec 12, 2025 | 5:31 PM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजप १३०-१४० जागांवर ठाम, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला ८०-९० जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसलाही काही मुस्लिम बहुल जागांवरून चर्चा सुरू आहे. वरिष्ठ स्तरावर युतीचा निर्णय झाला असून, स्थानिक समित्या चर्चा करतील.

मुंबई महानगरपालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय झाला असून, त्यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाला दुजोरा दिला आहे. या फॉर्म्युल्यानुसार, भारतीय जनता पक्षाने १३० ते १४० जागा लढवण्यावर ठाम भूमिका घेतली आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ८० ते ९० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार गट) देखील २५ मुस्लिम बहुल जागांपैकी १० ते १५ जागा हव्या असल्याची मागणी केली असून, यावरही सकारात्मक चर्चा झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

महायुतीच्या या जागावाटप आणि युतीच्या रणनीतीवर उच्चस्तरीय बैठका पार पडल्या आहेत. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात पहिली प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर रवींद्र चव्हाणांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास दोन तास सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत पालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. युतीसाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती स्थानिक स्तरावरील जागावाटप आणि समन्वयावर काम करेल. जिथे कुठे अडचणी निर्माण होतील, तिथे वरिष्ठ नेते हस्तक्षेप करून तोडगा काढतील असेही ठरवण्यात आले आहे.

Published on: Dec 12, 2025 05:31 PM