Nagpur | ट्रोलर्सला धडा शिकवण्यासाठी कठोर कायदे करा, सायबर तज्ज्ञ अजित पारसेंचं गृहमंत्र्यांना पत्र

| Updated on: Jul 15, 2021 | 2:32 PM

नागपुरातील सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना यासंबंधी एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. या पत्रातून सोशल माध्यमावरील छेडखानी आवरण्यासाठी तसंच ऑनलाईन छेडखानी रोखण्यासाठी कठोर कायदे करा, अशी मागणी केली आहे.

Follow us on

एखाद्या अभिनेत्रीने किंवा सेलिब्रिटींने चाकोरीबाहेरच्या विषयांना हात घातला तर ट्रोलिंग ठरलेली… संवेदनशील अभिनेत्री हेमांगी कवी हिने बाई ब्रा आणि बुब्स ही फेसबुक लिहिल्यानंतर तिलाही अशाच प्रकारे ट्रोल करण्यात आले तर काहींनी तिचं कौतुकही केलं. आता याच पार्श्वभूमीवर नागपुरातील एका सायबर तज्ज्ञांनी गृहमंत्र्यांना एक पत्र लिहून ट्रोलर्सला धडा शिकवण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

सायबर तज्ज्ञांचं गृहमंत्र्यांना पत्र

नागपुरातील सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना यासंबंधी एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. या पत्रातून सोशल माध्यमावरील छेडखानी आवरण्यासाठी तसंच ऑनलाईन छेडखानी रोखण्यासाठी कठोर कायदे करा, अशी मागणी नागपुरातील सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी गृहमंत्री दिपील वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.