Beed : मोकाट मकोका आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो अन् रिल्स केले पोस्ट

Beed : मोकाट मकोका आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो अन् रिल्स केले पोस्ट

| Updated on: Jul 07, 2025 | 6:22 PM

समोर आलेल्या माहितीनुसार, फड सध्या परळीत मोकाट फिरतोय. इतकंच नाहीतर व्हाट्सअपवर अॅक्टिव्ह आहे, तसेच फेसबुकवर रील्स पोस्ट करून तो अॅक्टिव्ह असल्याचेही पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडचे फोटो आणि इतर आरोपींसोबतच्या पोस्ट्सही तो शेअर करत आहे. त्याचप्रमाणे गोट्या गिते देखील परळीत फिरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

मकोकातील आरोपी गोट्या गितेसह धनराज ऊर्फ राजेभाऊ फड हे फरार आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडचे फोटो आणि रील धनराज ऊर्फ राजेभाऊ फडने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. धक्कादायक म्हणजे हे आरोपी परळीमध्ये खुलेआम फिरत असल्याची सूत्रांची माहिती आहे. बीड नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी परळीतील गोट्या गिते सदस्य असलेल्या रघुनाथ फड या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. या कारवाईत पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात, मात्र दोन आरोपी अद्याप फरार आहेत. मात्र यातील एक आरोपी धनराज ऊर्फ राजेभाऊ फड सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Jul 07, 2025 06:22 PM