अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?

| Updated on: Dec 18, 2025 | 10:08 AM

नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. १९९५ च्या फ्लॅट वाटप घोटाळ्यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना १० हजार रुपये दंडासह दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलिसांना वॉरंट मिळाल्याने कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांच्या मंत्रीपदावर संकट आले आहे.

नाशिक न्यायालयाने काढलेले अटक वॉरंटची प्रत नाशिक पोलिसांना प्राप्त झाली आहे, ज्यामुळे माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. १९९५ मधील फ्लॅट वाटप घोटाळा प्रकरणात नाशिक कनिष्ठ न्यायालयाने त्यांना १० हजार रुपये दंडासह दोन वर्षांची शिक्षा कायम केली आहे.

कोकाटे बंधूंनी नाशिकमधील कॉलेज रोड परिसरातील निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट मिळवण्यासाठी आपण अल्प उत्पन्न गटातील असल्याचे आणि कोणतीही मालमत्ता नसल्याचे खोटे दावे केले होते. चौकशीत यासाठी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. या निर्णयानंतर कोकाटे यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

Published on: Dec 18, 2025 10:08 AM