Marathi RajBhasha Din 2025 : ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मराठी भाषा दिन… ‘माय मराठी’च्या भव्य सोहळ्यात उद्धव ठाकरे काय करणार मार्गदर्शन?

Marathi RajBhasha Din 2025 : ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मराठी भाषा दिन… ‘माय मराठी’च्या भव्य सोहळ्यात उद्धव ठाकरे काय करणार मार्गदर्शन?

| Updated on: Feb 27, 2025 | 11:54 AM

दरवर्षी २७ फेब्रवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्य सरकार, विविध सामाजिक, खासगी संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देखील मराठी भाषा दिनाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आज राज्यभरात मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्राकडून गेल्या काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. दरवर्षी कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षी २७ फेब्रवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्य सरकार, विविध सामाजिक, खासगी संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देखील मराठी भाषा दिनाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात शिवसेनाप्रणित स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचा कार्यक्रम होणार आहे. न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळात आयोजित केलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यात मराठीचा जागर केला जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर केले जाणार आहे. याशिवाय संपूर्ण मरीन लाईन्स परिसर डौलाने फडकणाऱ्या झेंड्यांमुळे भगवामय होणार असून माय मराठीच्या गौरवाच्या घोषणांनी दुमदुमणार आहे.

Published on: Feb 27, 2025 11:54 AM