सत्ता गेली मान्य, पण सयंम हवा; दीपक केसरकर यांचा आदित्य ठाकरे यांना टोला

| Updated on: Jan 25, 2023 | 10:52 AM

'सत्ता गेली ठीक आहे. पण थोडा संयम राखला पाहिजे. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ होऊ नये. डोक्यात राग घेऊ नका, थोडं शांत व्हा', केसरकरांचा आदित्य ठाकरेंना सल्ला

Follow us on

नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस दौऱ्यावरून राज्यात परतले. मात्र एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याच्या खर्चावरून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. इतकेच नाही तर दावोस दौऱ्यासाठी मुख्यमंत्री चार्टड फ्लाईटने आले त्यावरूनही आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेतला आहे. यासर्व आरोपांवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार टीका करत प्रत्युत्तर दिले आहे.

भारतातील अनेक राज्यांनी असे निर्णय घेतले ज्यामुळे ती राज्य दिवाळखोर होणार आहेत. त्यामुळे मतांचे राजकारण करायचं की हिताचं राजकारण करायचं हे त्या-त्या राज्याने ठरवायचं असतं. महाराष्ट्र मोठा आहे. राज्यात पंतप्रधानांचा दौरा होता. त्यामुळे मुख्यमंत्री चार्टड फ्लाईटने मुंबईत आले. प्रत्येक दौऱ्याची आणि त्यासाठी झालेल्या खर्चाची नोंद सरकार दरबारी असते. सरकारचं ऑडिट स्ट्रिक्ट असतं, ज्यांना अनुभव आणि परिपक्वता नाही, ते लोकं वारंवार असंच बोलतात, अशी टीका दीपक केसरकरांनी पत्रकार परिषद घेत केली. पुढे ते असेही म्हणाले, सत्ता गेली ठीक आहे. पण थोडा संयम राखला पाहिजे. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ होऊ नये. डोक्यात राग घेऊ नका, थोडं शांत व्हा, असा सल्लाही त्यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.