Pratap Sarnaik : प्रताप सरनाईक विधानभवनातून मीरा रोडकडे रवाना

Pratap Sarnaik : प्रताप सरनाईक विधानभवनातून मीरा रोडकडे रवाना

| Updated on: Jul 08, 2025 | 12:51 PM

Mira Bhayandar MNS Morcha : मनसेच्या मोर्चाला पाठिंबा दिल्यानंतर आता मंत्री प्रताप सरनाईक मोर्चाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कार्यकर्त्यांना एका हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, आता या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे सुरक्षा कवच तोडून बाहेर पडत मोर्चासाठी पुन्हा एकदा एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. मुंबई आणि आसपासच्या भागातील मनसे पदाधिकारी, विशेषतः बोरीवली, कांदिवली यासह इतर परिसरातील कार्यकर्ते, मोठ्या संख्येने मीरा-भाईंदरच्या दिशेने निघाले आहेत.

पोलिसांच्या कारवाईनंतरही मनसे कार्यकर्ते पुन्हा एकवटले असून, मीरा-भाईंदर परिसरात मोर्चासाठी जमण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे परिसरातील राजकीय वातावरण पुन्हा तणावपूर्ण बनले आहे. तर दुसरीकडे मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मोर्चाला पाठिंबा दिल्यानंतर ते देखील या मोर्चाच्या दिशेने रवाना झालेले असल्याचं बघायला मिळालं आहे. मला कोण अटक करतो बघतं, असं थेट आव्हानच सरनाईक यांनी पोलिसांना दिलं आहे.

Published on: Jul 08, 2025 12:51 PM