Suresh Dhas : माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणावर धसांच स्पष्टीकरण

Suresh Dhas : माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणावर धसांच स्पष्टीकरण

| Updated on: Mar 15, 2025 | 12:20 PM

Suresh Dhas On Ashish Rasal Case : आशिष विशाळ हा माझा कार्यकर्ता आहे, पण तो चुकला असेल तर त्याच्यावर कारवाई करा, असं म्हणत आज आमदार सुरेश धस यांनी या संपूर्ण खंडणी प्रकरणात स्पष्टीकरण दिलं आहे.

आशिष विशाळ हा माझा कार्यकर्ता आहे, पण ते पत्र मी त्याला दिलेलं नाही, असं आमदार सुरेश धस यांनी म्हंटलं आहे. ते पत्र म्हणजे कोणाचा तरी खोडसाळपण आहे, असंही धस यांनी म्हंटलं आहे. माझी सही करायला सोप्पी असल्याने असा खोडसाळपणा हा केला जात असतो. माझी सही कोणीही करतं. त्यामुळे तो माझा कार्यकर्ता असला तरी हे पत्र मी दिलेलं नाही. शिवाय ते जे तुळजापूरचे पत्रकार आहेत त्यांच्याशी देखील माझा संबंध नाही. आमचा कोणताही वाद देखील नाही, असं यावेळी बोलताना सुरेश धस यांनी म्हंटलं आहे.

देशमुख यांच्या नावाने खंडणी मागतो म्हणून मराठा तरुणांनी मारहाण केलेला आशिष विशाळ सहकारी असल्याचं आमदा सुरेश धस यांनी अखेर कबूल केलं आहे. तसेच आशिष विशाळ हा माझा कार्यकर्ता असला तरी मी ते पत्र दिले नाही. माझी सही करायला सोपी आहे म्हणून ती कोणीही करतं. पण ते पत्र मी दिले नाही. त्यामुळे त्याने जर खरंच पैसे घेतले असतील तर त्याच्यावर कारवाई करा, असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

 

Published on: Mar 15, 2025 12:20 PM