Suresh Dhas News : सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
Suresh Dhas In Shirur Kasar : आमदार सुरेश धस हे आज कासार शिरूरच्या दौऱ्यावर असून याठिकाणी ते खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हरणाची शिकार आणि मारहाण प्रकरणात सध्या पोलीस कोठडीत असलेला सतीश उर्फ खोक्या हा धस यांचा कार्यकर्ता आहे.
आष्टी तालुक्याचे आमदार सुरेश धस यांची आज शिरूर कासार येथे आम सभा पार पडणार आहे. त्यासाठी ते शिरूर कासारमध्ये दाखल झाले आहेत. या आमसभेनंतर ते त्यांचा कार्यकर्ता आणि शिरूरच्या मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत.
खोक्या भोसले याच्यावर मारहाण प्रकरणाबरोबरच हरणांची शिकार केल्याचा देखील आरोप आहे. खोक्या भोसले याचे घर हे वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने अतिक्रमण तोडक कारवाई करत वन विभागाने 2 दिवसांपूर्वी खोक्याचं घर पाडलं आहे. त्यानंतर ही कारवाई करायला एवढी घाई का? असा प्रश्न आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आज ते शिरूर कासार येथे आम सभेला जाणार असून तेथे भोसले कुटुंबाची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Published on: Mar 16, 2025 02:29 PM
