Mira Road MNS Protest : अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात, मनसैनिक आक्रमक

Mira Road MNS Protest : अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात, मनसैनिक आक्रमक

| Updated on: Jul 08, 2025 | 9:24 AM

Avinash Jadhav News : मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे मीरा रोडमधील मनसैनिक आक्रमक झाले आहेत.

अमराठी व्यापाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे आज मीरा-भाईंदर शहरात मोर्चा काढणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. सोमवारपासून पोलिसांनी मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी आज पहाटे 3:30 वाजता मोठ्या पोलीस फौजेसह अविनाश जाधव यांच्या निवासस्थानी धडक देत त्यांना ताब्यात घेतले. जाधव यांना आधीच नोटीस देण्यात आली होती, परंतु ते मोर्चात सहभागी होण्यावर ठाम होते. त्यांनी मराठी बांधवांना मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. सध्या जाधव यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. जाधव यांच्यापाठोपाठ पोलिसांनी मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. वसई आणि विरारमधील मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असून, यामुळे आजच्या मोर्चावर अनिश्चिततेचे सावट आहे. हा मोर्चा सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होऊन मिरा रोड स्टेशन परिसरात समाप्त होणार आहे.

Published on: Jul 08, 2025 08:51 AM