Raj Thackeray Aurangabad Sabha Live | बसायला काय उभं राहायलाही जागा नाही
राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेत चोरी
Image Credit source: tv9 marathi

Raj Thackeray Aurangabad Sabha Live | ‘बसायला काय उभं राहायलाही जागा नाही’

| Updated on: May 01, 2022 | 9:47 PM

महाराष्ट्रात कोणत्याही कोपऱ्यात सभा घेतली असती तर दूरदर्शनवरून पाहिलं असतं ना. गुढी पाडव्याच्या सभेनंतर अनेक लोक बडबडायाला लागेल. त्याला उत्तर देण्यासाठी उत्तर सभा घेतली. दोनच सभा घेतल्या. त्यावर किती बोलत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा पार पडली. बसायला सोडा पण उभं राहायला पण जागा नाहीये. तुमच्या घोषणा थांबल्या तर मला अनेक गोष्टी बोलता येतील. बाहेर हजारो लोकं आहेत, त्यांना आत येता येत नाही. 1 मे च्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनांच्या शुभेच्छा देतो. सभा होणार नाही होणार, सभा घ्यावी नाही घ्यावी. सभेला परवानगी द्यावी नाही द्यावी, का ही गोष्ट केली माहीत नाही. महाराष्ट्रात कोणत्याही कोपऱ्यात सभा घेतली असती तर दूरदर्शनवरून पाहिलं असतं ना. गुढी पाडव्याच्या सभेनंतर अनेक लोक बडबडायाला लागेल. त्याला उत्तर देण्यासाठी उत्तर सभा घेतली. दोनच सभा घेतल्या. त्यावर किती बोलत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.