Raj Thackeray : नको तिथं सरकार भीती दाखवतं, त्यापेक्षा इथं.., राज ठाकरेंनी फटकारलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट झाली. या भेटीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेतून सरकारवर निशाणा साधत चांगलंच फटकारल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांनी पार्किंग, पार्किंगचे दर, मुंबईत वाढणाऱ्या वाहनांची संख्या, मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यांवर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, बाहेरून मुंबईत येणारी माणसं थांबवली पाहिजेत. गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंचा दर परवडायला हरकत नसेल. महिन्याला दोन तीन हजार असेल तरी तुमची गाडी सेफ राहते. रोज या शहरात माणसं आदळत आहेत. रस्ते मोठे होत नाही. इमारती उंच होत आहे. सी लिंकला पार्किंगचा लॉट केला होता. काही प्रेशरने काढायला लावला. आमच्यासमोर पार्किंग नको असं धनदांडग्यांनी सांगितलं. तुमच्यासमोर पार्किंग नको म्हणजे काय? माणसं येणारी थांबवली पाहिजे. सरकार नको तिथं भिती दाखवतं असं म्हणत राज ठाकरेंनी फटकरालं तर ‘अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना. इथे गरजेचं आहे. उद्या ज्या प्रकारच्या जमिनी अदानीच्या घशात घातल्या जाणार आहे. काय होणार आहे धारावीत? कोणते रस्ते होणार आहे. पुण्यासारखी परिस्थिती आहे. पुण्यात जाऊन बघा. थायलंडला जाऊन बघा. फक्त ब्रिज आणि मेट्रोने नाही प्रश्न सुटणार. तुम्हाला वाहनं नियंत्रित कराव्या लागतील.’, असं राज ठाकरे म्हणाले.
