Mira Bhayandar MNS Morcha : हा सत्तेचा माज.. ; पोलिसांनी मनसेच्या संतोष धुरींना ताब्यात घेतलं

Mira Bhayandar MNS Morcha : हा सत्तेचा माज.. ; पोलिसांनी मनसेच्या संतोष धुरींना ताब्यात घेतलं

| Updated on: Jul 08, 2025 | 12:00 PM

मीरा भाईंदरमध्ये तत्काळ पोहोचा अशा सूचना मनसेच्या कार्यकर्त्यांना नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत.

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी

मीरा भाईंदरमध्ये तत्काळ पोहोचा अशा सूचना मनसेच्या कार्यकर्त्यांना नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत. मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली आहे. मोर्चासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना मिळेल त्या गाडीमध्ये कोंबुन पोलीस ठाण्यात नेल जात आहे. त्यामुळे या ठिकाणी चांगलाच गोंधळ निर्माण झालेला असून तणाव देखील बघायला मिळत आहे.

दरम्यान या ठिकाणी मनसे नेते संतोष धुरी यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आज पहाटे अविनाश जाधव यांना पोलिसांनी मोर्चा पूर्वीच ताब्यात घेतलं आहे. तर अनेक पदाधिकारी नेत्यांना नोटिस देखील पाठवल्या आहेत. मीरा भाईंदरमध्ये पोलिसांनी जमाव बंदीचा आदेश लागू केला असून आता संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा सगळ्या सत्तेचा माज असून तोच माज दाखवला जात आहे. मात्र महाराष्ट्राच्या कोपऱ्याकोपऱ्यातून मराठी माणूस इथे यायला निघाला आहे. कोणाकोणाला ताब्यात घ्याल? आम्हाला ताब्यात घेण्यापलीकडे हे सरकार काय करू शकतं? असा संतप्त सवाल यावेळी धुरी यांनी बोलताना उपस्थित केला आहे.

Published on: Jul 08, 2025 11:55 AM