Sanjay Raut : अमित शाहांचा कडेलोट करा; संजय राऊत भडकले
Sanjay Raut On Amit Shah Statement : अमित शाह यांच्याकडून शिवरायांचा अपमान झाला आहे. त्यांचा कडेलोट मुख्यमंत्र्यांनी करावा, असं वक्तव्य शिवसेना उबठाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
अमित शाह यांच्याकडून शिवरायांचा अपमान झाला आहे. त्यांचा कडेलोट करा, असं वक्तव्य उबठाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. अमित शाह यांच्याकडून रायगडावर शिवरायांचा वारंवार एकेरी उल्लेख करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांच्यावर गुन्हा दाखल करावा असंही संजय राऊत म्हणाले आहेत. औरंगजेबाच्या थडग्याला शाहांनी समधीचा दर्जा दिला, असंही राऊत म्हणाले.
यावेळी राऊत म्हणाले की, छत्रपतींचा उल्लेख शिवाजी-शिवाजी असा करण्यात आला. जो आम्ही कधीच करत नाही. औरंगजेबाच्या थडग्याला सुद्धा समाधी म्हणून मान्यता देण्यात आली. देशाचे गृहमंत्री बोलतात म्हणजे ती समधीच मानली पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? मग आता मुख्यमंत्री अमित शाह यांचा कडेलोट करणार आहेत का? असा खोचक प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.
Published on: Apr 13, 2025 02:16 PM
