Pune | पुण्यात MPSC विद्यार्थी आंदोलन, जरांगेंचा थेट मंत्री उदय सामंतांना फोन, काय दिलं चर्चेदरम्यान आश्वासन?

Pune | पुण्यात MPSC विद्यार्थी आंदोलन, जरांगेंचा थेट मंत्री उदय सामंतांना फोन, काय दिलं चर्चेदरम्यान आश्वासन?

| Updated on: Jan 03, 2026 | 5:55 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलन प्रकरणी फोनवरून चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान विद्यार्थांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन उदय सामंत यांनी दिलंय. या संदर्भात उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलन प्रकरणी फोनवरून चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान विद्यार्थांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन उदय सामंत यांनी दिलंय. या संदर्भात उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांशी जरांगेंनी बातचीत केली आहे. सर्व नेत्यांसोबत चर्चा करत विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही तर त्यांचे पेपर घेतले जातील असं आश्वासन या चर्चेदरम्यान देण्यात आलं.

चार तारखेची परीक्षा ही घेणारच. परीक्षांमुळे कोणत्याही विद्यार्थांचं नुकसान होऊ नये असं वक्तव्य जरांगेंनी केलं. काही विद्यार्थी पेपरला जातील तर काही विद्यार्थी जाणार नाहीत असं व्हायला नको,आपण प्रयत्न करतोय त्यामुळे विद्यार्थांनी पेपरला जावं असं आवाहन जरांगेंनी केलं आहे.

 

 

Published on: Jan 03, 2026 05:49 PM