Mumbai Heavy Rain : मुंबईची लाईफलाईन ठप्प, दादर अन् CSMT स्थानकात मोठी गर्दी, प्रवाशांचा संताप…बघा परिस्थिती काय?
ठाणे ते सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन रद्द कऱण्यात आल्या तर ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या उशिराने धावत आहे. ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या मध्येच ठप्प झाल्यामुळे रेल्वे प्रवासी रेल्वे ट्रॅकने ठाणे स्थानक गाठत आहे. सायंकाळच्या वेळेस परतीचा प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गांला मोठा फटका बसलाय.
गेल्या दोन दिवसापासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनची वाहतूक काही वेळापर्यंत विस्कळीत झाली होती. मात्र मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने आता मुंबई लोकल ठप्प झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या तिनही मार्गावर या मुसळधार पावसाचा फटका बसल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. आठवड्या पहिल्याच दिवशी काल मुसळधार पावसाने चाकरमान्यांची चांगलीच दाणादाण उडवून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. आज सकाळी कसे बसे रेल्वे प्रवाशांनी आपले ऑफिस गाठले होते. मात्र परत येत असताना प्रवाशी दादर, सीएसएमटी स्थानकावर अडकून पडल्याचे पाहायला मिळतंय. बघा दादर आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकात काय परिस्थिती?
Published on: Aug 19, 2025 05:58 PM
