Kishori Pednekar | मुंबई महापालिकेसाठी ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल

Kishori Pednekar | मुंबई महापालिकेसाठी ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल

| Updated on: Jan 22, 2026 | 3:30 PM

मुंबई महापालिकेचं महापौर पद एसटी वर्गासाठी राखीव होईल अशी चर्चा होती. पण आज ऐनवेळी मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. अनेक महापालिकांवर भाजपाची एक हाती सत्ता आली आहे. मुंबईसह पुण्यात खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव झाले आहे. मात्र आरक्षण सोडत जाहीर होताच राजकीय समीकरणे थेट बदलल्याचे बघायला मिळत आहे. अनेक इच्छुकांच्या आशांवर पाणी फिरताना दिसत आहे. मुंबई महापालिकेचं महापौर पद एसटी वर्गासाठी राखीव होईल अशी चर्चा होती. पण आज ऐनवेळी मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. ठरवून सोडत काढण्यात आली आहे, असा आरोप करतानाच ST प्रवर्गाच्या चिट्ठ्या का टाकल्या नाही? असा सवाल पेडणेकरांनी उपस्थित केला आहे. जाणूनबुजून, ठरवून केलेली ही लॉटरी आहे, असं म्हणत पेडणेकरांनी या सोडतीच्या कार्यक्रमावर बहिष्कारही टाकला आहे.

Published on: Jan 22, 2026 03:30 PM