Mumbai Rain Alert : मुंबईत पावसाचा कहर! समुद्र खवळला उंच लाटा, शुकशुकाट अन्… मरीन ड्राईव्ह अन् जुहूची काय परिस्थिती?

Mumbai Rain Alert : मुंबईत पावसाचा कहर! समुद्र खवळला उंच लाटा, शुकशुकाट अन्… मरीन ड्राईव्ह अन् जुहूची काय परिस्थिती?

| Updated on: Aug 20, 2025 | 2:11 PM

समुद्रातील भरती-ओहोटीमुळे जुहू बीच आणि मरीन ड्राईव्हवर उंच लाटा उसळत आहेत. मुंबईत आज सकाळपासून पाऊस थांबला आहे पण समुद्रात भरती-ओहोटीचा इशारा देण्यात आला आहे..

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा चांगलाच धुमाकूळ पाहायला मिळतोय. अशातच हवामान खात्याकडून मुंबईला आज पुन्हा एकदा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत संततधार सुरू असताना अचानक पावसाचा जोर वाढला आणि मुंबईची तुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे जुहू बीच आणि मरीन ड्राईव्हवर समुद्राच्या उंच लाटा दिसताय. समुद्र खवळलेला असताना प्रशासनाकडून  समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन मुंबईकरांना करण्यात आलंय.  मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या उंचच उंच लाटा उसळल्या असून पाण्याची पातळी देखील वाढली आहे. त्यामुळे परिसरात शुकशुकाट निर्माण झालाय. नेहमी गर्दी असणाऱ्या मॉर्निंग वॉकसाठी नागरिक आणि पर्यटकांचा अभाव दिसतोय. तर समुद्रातील भरती-ओहोटीमुळे जुहू बीचवर ४ मीटर उंच लाटा उसळत आहेत.

मुंबईत काल मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. दरम्यान आज पावसाचा जोर कमी झाला असला तरी समुद्र अजूनही खवळलेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १० वाजून १९ मिनिटांनी समुद्राला हाय टाईड असून ३.९९ मिमी उंच लाटा उसळणार असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आलंय.

Published on: Aug 20, 2025 01:16 PM