Girish Mahajan : मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करेल; मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

Girish Mahajan : मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करेल; मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

| Updated on: Jun 09, 2025 | 4:48 PM

Mumbai Local Train Accident : मुंबईतील लोकल अपघातात मृत झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबाला सरकार आर्थिक मदत करणार आहे. तसंच जखमींना देखील मदत करण्यात येणार आहे.

मुंब्य्राच्या अलिकडे वळणावर दोन लोकल एकमेकांना क्रॉस करत असताना सदर अपघात घडला. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

मुंब्रा येथे झालेल्या लोकलच्या अपघातावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पुढे बोलताना महाजन म्हणाले की, दोन गंभीर रुग्ण आहेत. त्यामुळे त्यांना ज्युपिटर रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. त्यांच्यावर सीटीस्कॅन आणि एमआरए झालं आहे. त्या रुग्णालयांवर शस्रक्रिया करायची आहे, याबाबत मी माहिती घेत आहे. त्यांच्यावरही आज किंवा उद्या शस्रक्रिया केली जाईल. त्यानंतर त्यांना घरी पाठवलं जाईल. अपघातातील जवळपास 10 रुग्णांना कळवा रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यातील  तसेच जे 7 रुग्ण याठिकाणी आहे, ते फ्रॅक्चर आहेत. पण आऊटऑफ डेंजर आहेत, असं महाजन यांनी सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून अपघातात ज्या 4 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना मदत म्हणून आम्ही 5 लाख रुपये जाहीर केले आहेत. याशिवाय जखमींना 50 हजार, एक लाख किंवा दोन लाख रुपये दिले जातील. तसेच त्यांचा सर्व उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल. याशिवाय ज्युपिटरला जे दोन रुग्ण गंभीर आहेत, त्यांचा सर्व खर्च शासन करेल, अशी माहिती महाजन यांनी दिली.

Published on: Jun 09, 2025 04:48 PM