थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण

थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण

| Updated on: Dec 18, 2025 | 4:47 PM

नंदुरबार जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. ही गुलाबी थंडी रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांसाठी अत्यंत पोषक ठरत आहे, दवबिंदू गोठत आहेत. मात्र, पपई आणि केळीसारख्या फळबागांना फटका बसत असल्याने शेतकरी पिकांचे संरक्षण करत आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

दुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाल्याने गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. वाढलेली थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी, विशेषतः गहू आणि हरभऱ्यासाठी अत्यंत पोषक ठरत आहे. शेतात दवबिंदू गोठलेले दिसून येत असून, यामुळे या पिकांना चांगला फायदा होत आहे.

मात्र, या थंडीचा काही फळबागांना, विशेषतः पपई आणि केळीच्या पिकांना फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी या पिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करत आहेत. ग्रामीण भागात पहाटे आणि रात्री थंडी वाढल्याने शेतकरी शेकोटीचा आधार घेत शेतीला पाणी देत आहेत. दुसरीकडे, सकाळच्या सत्रात सूर्यदर्शन होत असल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

सातपुड्याच्या दुर्गम भागांमध्येही दवबिंदू गोठत असून धुक्याची चादर पसरत असल्याने पर्यटकांना आनंद मिळत आहे. हवामान खात्याने नंदुरबार जिल्ह्यात पुढील काही दिवस थंडी अशीच कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे. नागरिकांना थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Dec 18, 2025 04:47 PM