Sanjay Raut Full Press | अंजली दमानियांकडे एवढ्या कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? संजय राऊतांनी या मंत्र्याच्या कार्यालयाकडे दाखवले बोट; मोठी खळबळ

| Updated on: Apr 04, 2026 | 2:08 PM

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या फोन कॉल्ससंदर्भात मोठे खुलासे केले. त्यांनी सांगितले की, खरातने कोणत्या नेत्याशी किती वेळा फोन केला आणि कोणत्या नेत्याने त्याला किती वेळा फोन केला, तसेच प्रत्येक कॉल किती वेळा झाला, अशी संपूर्ण माहिती त्यांनी उघड केली. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टिप्पणी केली आहे. राऊत म्हणाले की, ही माहिती केवळ मुख्यमंत्री कार्यालयातून मिळाल्याशिवाय कुणालाही मिळू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणामागे सरकारच्या टार्गेटवर कोणी आहे, असा अर्थ निघतो. राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सूचक निशाणा साधला आहे.

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. महिलांवर अत्याचार प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे, खरातकडे राजकारणी, नेते आणि सेलिब्रिटी येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे राजकीय संबंध देखील उघड झाले आहेत. काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या फोन कॉल्ससंदर्भात मोठे खुलासे केले. त्यांनी सांगितले की, खरातने कोणत्या नेत्याशी किती वेळा फोन केला आणि कोणत्या नेत्याने त्याला किती वेळा फोन केला, तसेच प्रत्येक कॉल किती वेळा झाला, अशी संपूर्ण माहिती त्यांनी उघड केली. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरातसोबत 17 कॉल तर रूपाली चाकणकर यांचे 177 कॉल झाले आहेत, असे दमानिया यांनी सांगितले.
यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टिप्पणी केली आहे. राऊत म्हणाले की, ही माहिती केवळ मुख्यमंत्री कार्यालयातून मिळाल्याशिवाय कुणालाही मिळू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणामागे सरकारच्या टार्गेटवर कोणी आहे, असा अर्थ निघतो. राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सूचक निशाणा साधला आहे.

Published on: Apr 04, 2026 02:08 PM
Follow Us