Nashik | नाशिकमध्ये अधिकाऱ्यांनी हटवलेले मनसेचे होर्डिंग कार्यकर्त्यांनी पुन्हा लावले

Nashik | नाशिकमध्ये अधिकाऱ्यांनी हटवलेले मनसेचे होर्डिंग कार्यकर्त्यांनी पुन्हा लावले

| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 10:06 AM

नाशिक महापालिकेने काल काढलेले होर्डिंग मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा लावले. मनसे कार्यकर्ते आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये काल बाचाबाची झाली होती. महापालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने मनसेचे होर्डिंग काढले होते. राज ठाकरे आणि अमित ठाकरे थांबले त्या हॉटेलच्या समोरच मनपा अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती.

नाशिक महापालिकेने काल काढलेले होर्डिंग मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा लावले. मनसे कार्यकर्ते आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये काल बाचाबाची झाली होती. महापालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने मनसेचे होर्डिंग काढले होते.
राज ठाकरे आणि अमित ठाकरे थांबले त्या हॉटेलच्या समोरच मनपा अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी रातोरात पुन्हा त्याच ठिकाणी होर्डिंग लावले. मनसे कार्यकर्ते आणि पालिका प्रशासनाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.