मुख्यमंत्र्यांबद्दल बोलाल तर यादी राखा! माफी मागा नाहीतर…; संजय राऊतांना थेट इशारा

मुख्यमंत्र्यांबद्दल बोलाल तर यादी राखा! माफी मागा नाहीतर…; संजय राऊतांना थेट इशारा

| Updated on: Feb 20, 2023 | 9:30 AM

शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला आहे. ते काय म्हणालेत? पाहा...

नाशिक : शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश बेलदार यांनी राऊतांच्या वक्तव्याबाबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना आक्रमक भूमिका घेतलीये. “संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचं श्रद्धास्थान आहेत. राऊतांना उत्तर द्यायचं नाही, असं नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. पण मुख्यमंत्री शिंदेंबद्दल बोलाल तर यादी राखा. माफी मागा नाहीतर नाशिक मध्ये फिरू देणार नाही. संजय राऊत शरद पवारांचे शिवसैनिक आहेत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचा शिवसैनिक काय असतो तुम्हाला दाखवून देऊ, असं योगेश बेलदार म्हणालेत.

Published on: Feb 20, 2023 09:30 AM