Nawab Malik | महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने : नवाब मलिक

Nawab Malik | महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने : नवाब मलिक

| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 9:57 PM

ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापेमारी होतेय. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी परंतु ज्या पध्दतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

मुंबई : महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने आणि राजकीय हेतूने घडतंय असा आरोप अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे, त्यावरुन नवाब मलिक यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापेमारी होतेय. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी परंतु ज्या पध्दतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व प्रलंबित आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला ईडीला सांगितले होते, असेही नवाब मलिक म्हणाले.