“नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला जर विरोधीपक्षच नसेल तर…”, सुप्रिया सुळे यांची नाराजी

| Updated on: May 28, 2023 | 12:23 PM

VIDEO | नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोधी पक्षातील नेत्यांना का बोलावलं नाही?; सुप्रिया सुळे यांचा मोदी सरकारला थेट सवाल

Follow us on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथील नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या संसद भवनाच्या झालेल्या उद्घाटन सोहळ्याला विरोधकांनी आपला बहिष्कार नोंदवल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यावर राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा दिवस आहे. विरोधीपक्ष जर नसेल तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना बोलवायला हवं होतं. जे विरोधी पक्षातील काही खासदार या कार्यक्रमाला गेले आहेत ते नेमके कसे गेलेत तेही पाहणं महत्वाचं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर आम्हाला 3 दिवसांपूर्वी कमिटी मेंबर म्हणून मेसेज आला. लोकसभा, संसद आमच्यासाठी मंदिर आहे. संसदेची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते. एरवी बिल पास करायचे असतात तेव्हा मंत्री विरोधी पक्षातील नेत्यांना फोन करतात. मग जर सरकारने आता संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी या देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना फोन केला असता तर सगळे गेले असते. हा कार्यक्रम वैयक्तिक आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.