निवडणुका नसल्यानं महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली, विजय वडेट्टीवार यांची टीका

| Updated on: Feb 01, 2023 | 1:56 PM

देशातील मुख्य कणा असणाऱ्या ओबीसी समाज, आदिवासी आणि शेड्युल कास्टच्या योजनांना या अर्थसंकल्पातून कात्री, वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

Follow us on

नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील पाचवं आणि शेवटचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून यावर कौतुक केले जात आहे तर काही नेत्यांकडून टीका देखील केली जात आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना, गरिबांना हद्दपार केल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, ग्रामीण भागात रोजगार निर्माण व्हावा, यासाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही. देशातील मुख्य कणा असणाऱ्या ओबीसी समाजासाठी, आदिवासी आणि शेड्युल कास्टच्या योजनांना या अर्थसंकल्पातून कात्री लावली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. डिजिटलायझेशनवर केवळ भर दिला असून निवडणुका नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केलेले आहे. तर निवडणुका नसल्याने महाराष्ट्राच्या तोंडाला केवळ पानं पुसली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.