Supriya Sule : कशाचे पेढे अन् काय…, 12 वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवी देशमुखला फोन, बघा काय म्हणाल्या?

Supriya Sule : कशाचे पेढे अन् काय…, 12 वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवी देशमुखला फोन, बघा काय म्हणाल्या?

| Updated on: May 06, 2025 | 4:00 PM

राज्याच्या विभागानुसार निकालाची आकडेवारी पाहिल्यास, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के लागला आहे. तर, लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६ टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ वी परीक्षेचा निकाल आज सोमवार ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. राज्याचा यावर्षीचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला. अशातच यंदा बारावीच्या परिक्षेला मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख बसली होती. तिला देखील ८५.११ टक्के इतके गुणे मिळाले आहेत. त्यामुळे मस्साजोगमधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  बारावीच्या निकालापूर्वी वैभवीने भावूक प्रतिक्रिया दिली ती म्हणाली, आज वडील पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी नाहीत, याचे मला दुःख आहे. पण त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगला येईल, असं म्हटलं होतं. दरम्यान, शरद पवार गट राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी १२ वीची निकाल जाहीर होताच उत्तीर्ण झालेल्या वैभवी देशमुखला फोन केला. सुप्रिया सुळेंनी फोनकरून तिचे अभिनंदन केले. बघा काय झाला दोघांत संवाद?

Published on: May 05, 2025 04:00 PM