अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यावर निलेश लंके यांचा खोचक टोला; म्हणाले, शिळ्या कढीला ऊत….

अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यावर निलेश लंके यांचा खोचक टोला; म्हणाले, शिळ्या कढीला ऊत….

| Updated on: Jul 16, 2024 | 1:06 PM

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्रासामुळेच निलेश लंके महाविकास आघाडीमध्ये गेल्याचा मोठा दावा अजित पवार यांनी केला आहे. अजित पवारांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी पलटवार केला आहे. इतकंच नाहीतर त्यावर प्रतिक्रिया देताना खोचक टोलाही लगावला

नगर आणि माढा बाबत करण्यात आलेलं वक्तव्य म्हणजे शिळ्या कढीला उत देण्यासारखं असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. तसेच मी आणि धैर्यशील मोहिते-पाटील निवडून आलो खासदार झालो आहे. आता त्या गोष्टीला महत्त्व राहिले नाही, असे मत देखील लंके यांनी व्यक्त केले आहे. दक्षिण नगर मधून निलेश लंके आणि माढ्यातून मोहिते पाटलांना महायुतीतून उमेदवारी देण्यात येणार होती, पण भाजपाने आम्हाला जागा सोडल्या नाहीत, या वक्त्यावरून लंके यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. ते सांगलीच्या जत मधील उमदी येथे बोलत होते.

अजित पवारांनी राज्यात सर्व्हे आणि 54 जागांवर करण्यात आलेल्या दाव्याबाबत बोलताना लंके म्हणाले, अजित पवार हे महायुतीमधील घटक पक्षाचे नेते आहेत. त्यामध्ये त्यांनी कुठल्या जागा घ्यायच्या, त्यांच्या पक्षाचा आणि महायुतीचा अधिकार आहे. त्यावर बोलणे योग्य नाही, असे स्पष्ट केलं. तसेच आपण खात्रीने सांगतो, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार असेल आणि जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील आमचे नेते ठरवतील,असे ही खासदार निलेश लंके यांनी म्हटले.

Published on: Jul 16, 2024 01:05 PM