One Nation One Election | केंद्र सरकार नवं विधेयक काढण्याच्या तयारीत; एक देश, एक निवडणूक होणार?
VIDEO | राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबरला बोलावलं, महत्त्वाचा अध्यादेश काढण्यात येणार? कीएक देश, एक निवडणूक होणार?
नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट २०२३ | केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान बोलावलं आहे. या कालावधीत होणाऱ्या अधिवेशनात मोठा आणि महत्त्वाचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. केंद्र सरकार या विशेष अधिवेशनात ‘एक देश एक निवडणूक’ याबाबतचं विधेयक मांडू शकतं. दरम्यान, देशात सर्व निवडणुका या आगामी डिसेंबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. हिवाळी अधिवेशनाआधीच हे पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे या अधिवेशनाला जास्त महत्त्व प्राप्त झालंय. ऐन गणेशोत्सवाच्या काळात हे अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विशेष अधिवेशनाबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. एक देश एक निवडणूकसाठी भाजप आग्रही राहिला आहे तर एक देश एक निवडणूक विधेयक मांडल्यानंतर विरोधी पक्षांची काय भूमिका असेल ते पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.
