Centra Cabinet Meeting : केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती
Operation Sindoor Cabinet Meeting : केंद्रीय कॅबिनेटच्या आज पार पडलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली आहे.
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यात आलेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सैन्याचे आभार मानल्याचं सुद्धा सूत्रांनी सांगितलं आहे. तसंच अंतर्गत सुरक्षेबाबत मंत्रीमंडळाला माहिती देण्यात आली आहे. याच बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमेवरची सध्याच्या परिस्थितीची माहिती देखील कॅबिनेट मंत्र्यांना दिली.
आज पार पडलेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याने शौर्याचं कौतुक करून देशाच्या सैन्याचे आभार मानले आहे. ऑपरेशन सिंदूरबद्दल या बैठकीत चर्चा झाली आहे. याबद्दलची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Published on: May 14, 2025 03:08 PM
