Operation Sindoor : पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल राजीव घईंची माहिती

Operation Sindoor : पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल राजीव घईंची माहिती

| Updated on: May 12, 2025 | 9:13 AM

DGMO Rajeev Ghai PC : तिन्ही लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या घडामोडीची माहिती आणि पुरावे दिले आहेत.

पाकिस्तानचे 9 दहशतवादी तळ भारताने नष्ट केले असल्याची माहिती राजीव घई यांनी दिली आहे. तसंच ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. 9 तारखेला केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक आणि अधिकारी मारले गेले आहेत, असंही घई यांनी सांगितलं आहे. तिन्ही लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.

पुढे त्यांनी सांगितलं की, आम्ही ज्या नऊ ठिकाणांना लक्ष्य केले त्यापैकी मुरीदके कॅम्प होता ज्याचे कसाब आणि डेव्हिड हेडली सारख्या दहशतवाद्यांशी संबंध होते. आमच्या विविध गुप्तचर संस्थांनी ज्या नऊ छावण्यांमध्ये दहशतवादी असल्याची पुष्टी केली होती, त्यांची आम्ही ओळख पटवली. यापैकी काही पीओकेमध्ये होते, तर काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात होते. हल्ल्यात आम्हाला कोणाला लक्ष्य करायचे आहे हे कळावे म्हणून आम्ही आकाशातून त्यांच्यावर लक्ष ठेवले. हे यासाठी देखील होते की आम्हाला पुरावा मिळावा की आम्ही जिथे हवे तिथे हल्ला केला होता, असंही यावेळी बोलताना घई म्हणाले.

Published on: May 12, 2025 09:13 AM