शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन ‘टायगर’, ठाकरे अन् काँग्रेसचे ‘हे’ बडे नेते हाती घेणार धनुष्यबाण?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणि काँग्रेसचे काही नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचीही चर्चा सुरू आहे. कोणत्या नेत्यांच्या नावाची सध्या होतेय चर्चा
शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन ‘टायगर’ सुरू असल्याची माहिती समोर येतेय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणि काँग्रेसचे काही नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचीही चर्चा सुरू आहे. यामध्ये रवींद्र धंगेकर, महादेव बाबर आणि रमाकांत म्हात्रे हे शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार का याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यासोबत सुभाष बने, गणपत कदम, चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसतेय. या चर्चांदरम्यान, मी वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटलो असल्याची प्रतिक्रिया रविंद्र धंगेकर यांनी दिली. सुरू असलेल्या चर्चेत शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या नेत्यांमध्ये कसब्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, हडपसर ठाकरे गट माजी आमदार महादेव बाबर, नवी मुंबई काँग्रसेचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे, संगमेश्वर ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने, राजापूर ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम, कोथरूड ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे.
