Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला

| Updated on: May 07, 2025 | 5:16 PM

India-Pakistan Tension : ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ चांगलाच घाबरलेला आहे. या हल्ल्यात भारताने तब्बल 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत.

भारताने हल्ले थांबवले तर आम्ही उत्तर देणार नाही, असं ख्वाजा आसिफने म्हंटलं आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ चांगलाच घाबरलेला आहे.

कोटलीमधील मरकज अब्बास उद्ध्वस्त झाला आहे. जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. याठिकाणी 100 ते 125 अतिरेकी याठिकाणी राहू शकत होते. दरवेळी 40 ते 50 जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी असायचे. जैश-ए-मोहम्मदचा हफिज अब्दुल शकुर उर्फ काजी झरार हा या मरकजचा प्रमुख होता. रात्री 12:30च्या दरम्यानकोटलीत भारतीय सैन्याने हवाई हल्ला केला. एकूण 9 ठिकाणी हे हवाई हल्ले केले गेले. त्यामुळे आता पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ पुरता घाबरलेला आहे.

Published on: May 07, 2025 05:16 PM