India Pakistan War : भारताकडून पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर, धावपट्टीही उद्ध्वस्त… बघा विध्वंसक  VIDEO

India Pakistan War : भारताकडून पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर, धावपट्टीही उद्ध्वस्त… बघा विध्वंसक VIDEO

| Updated on: May 10, 2025 | 4:28 PM

भारताने पाकिस्तानच्या रावळपिंडी, चकलाल, शेरकोट, रहीम यार खान सह काही एअरबेस लष्करी तळावर स्फोट घडवून आणला आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ आला समोर

भारताने पाकिस्तानातील रहीम यार खान एअरबेसलाही लक्ष्य केले होते आणि त्यावर हल्ला करून तो उडवून देण्यात आलाय. रहीम यार खान एअरबेस हा पाकिस्तान एअर फोर्सचा केवळ एक सक्रिय लष्करी एअरबेस नाही, तर ते एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. मात्र भारताने त्याला उद्धवस्त केले आहे. भारताने पाकिस्तानचा पंजाब प्रांतातील रहीम यार खान एअर बेस उडवल्यानंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

पंजाब प्रांतातील पाकिस्तानचा रहीम यार खान हा एअरबेस आहे. जैसलमेर पासून जवळ आहे. भारताच्या राजस्थान आणि गुजरात सीमेजवळ असल्याचे हा एअरबेस पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा होता. मात्र भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईंतर्गत रहीम यार खान एअरबेस उद्ध्वस्त झाला आहे. यावेळी एअरबेससह वेगवेगळ्या भागांचं मोठं नुकसान झालं आहे. यासह एअरबेसच्या आजू-बाजूच्या परिसरातील वास्तू देखील उद्ध्वस्त झाल्याचे दिसतेय. इतकंच नाहीतर रहीम यार खान एअरबेसची धावपट्टीही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. पाकिस्तानच्या रहीम यार खान एअरबेसच्या माध्यमातून पाकिस्तानने १९७१ च्या युद्धात भारतावर हल्ले केले होते. तोच आता भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलाय.

 

Published on: May 10, 2025 04:28 PM